10 दिवसांतच मनी प्लांट होईल हिरवागार, फक्त करा ही गोष्ट

हल्ली बहुतांश लोकांच्या घरात मनी प्लांट पाहायला मिळतो. मनी प्लांटला पैसा-संपत्ती आकर्षित करणारे रोपटे समजले जाते. वास्तुशास्त्रातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. असे सांगितले जाते की, मनी प्लांट घरात लावल्याने आर्थिक अडचणी कमी होऊन पैसे घरात येऊ लागतात. घरातील सुख समृद्धीही वाढते. तर ज्योतिषशास्त्रानुसार, मनी प्लांट घरात लावल्याने अनेक प्रकारचे वास्तूदोषही दूर होतात, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कित्येकघरात इतर कोणतेही नाही झाड नाही पण मनी प्लांट हमखास लावले जाते. पण, अनेकजणांची अशी तक्रार असते की, मनी प्लांट हिरवागार होत नाही किंवा पाने गळून पडतात. तुमच्याही बाबतीत असं घडतं असेल तर आज मनीप्लांट हिरवागार होण्यासाठी काय करायला हवे जाणून घेऊयात,

झाडांच्या वाढीसाठी वापरा ही गोष्ट –

मनी प्लांट हिरवागार करण्यासाठी तुम्ही स्वयंपाकघरातील एक गोष्ट वापरू शकता. यामुळे केवळ 10 ते 15 दिवसातच मनी प्लांट हिरवागार होण्यास सुरूवात होईल.

चहापावडर –

आपल्या घरात सकाळची सुरूवात ही चहाने होते. याच चहामध्ये वापरली जाणारी चहापावडर मनी प्लांट हिरवागार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. चहापावडरमध्ये नाइट्रोजन भरपूर प्रमाणात आढळते. पानांच्या वाढीसाठी नायट्रोजन हा सर्वात महत्त्वाचा पोषक घटक आहे. या घटकामुळे मातीची पीएच पातळी संतुलित होते आणि पाने हिरवीगार होतात.

Onion Peels Benefits For Plants: कांद्याच्या साली झाडांसाठी ठरतात पॉवर बूस्टर

कशी वापरायचे?

जर तुम्हाला वापरलेली चहा पावडर वापरायची असेल तर त्यासाठी उन्हात वाळवावी लागेल. यानंतर सुकलेली चहापावडर मातीमध्ये मिक्स करा. तुम्ही काही उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

हे ही महत्त्वाचे –

मनी प्लांट थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये.
मनी प्लांटला जास्त किंवा खूप कमी पाणी घालू नये.
खूप जास्त प्रमाणात चहापावडर वापरू नये.

Comments are closed.