कोणत्या देशात जास्त कुत्रे, भारताचा क्रमांक कितवा?

दिल्लीतील भटक्या कुत्र्यांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर कुत्र्यांचा मुद्दा सर्वेत्र चर्चेत आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर प्राणीप्रेमी आणि विरोध करणारे चांगलेच आमने-सामने आले आहेत. असे सर्व असले तरी कुत्र्याला इमानदार प्राणी अशी ओळख असून मानवाचा मित्र त्याला म्हटले जाते. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, जगातील कोणत्या देशामध्ये कुत्र्यांची संख्या जास्त आहे. आज आपण जाणून घेऊयात, जगातील असे टॉप 10 देश ज्यात कुत्र्यांची संख्या जास्त आहे आणि त्यात भारत कितव्या क्रमांकावर आहे.

रोमानिया –

रोमानियामध्ये कुत्र्यांची संख्या जवळपास 47 लाख असल्याचे बोलले जाते. एकेकाळी कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना मारण्याची पद्धत वापरली जायची. पण, प्राणी हक्क संघटनेच्या विरोधानंतर ही पद्धत बंद करण्यात आली.

फ्रान्स – फ्रान्स –

फ्रान्समध्ये जवळपास प्रत्येक कुत्र्याला मायक्रोचिप बसवण्यात आली आहे. त्यांच्या लसणीकरणाचे येथे कठोर नियम आहेत, ज्यामुळे रेबीजचे रुग्ण खूप कमी आढळतात.

अर्जेंटिना –

येथे जवळपास 92 लाख कुत्रे आहेत. या देशात जास्त प्रमाणात पाळीव कुत्रे आहेत.

फिलीपिन्स –

फिलीपिन्समध्ये कुत्र्यांची संख्या जवळपास 1.16 कोटी असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक नागरिकांचा रेबीजमुळे मृत्यु झाला आहे.

जपान –

जपानमध्ये 1.20 कोटी कुत्रे आहेत. येथे मुलांचं संगोपन करण्याऐवजी पाळीव प्राणी पाळणे पसंत केले जाते.

रशिया –

रशियामध्ये जवळपास 1.5 कोटी कुत्रे आहेत. तसेच येथील कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

रशिया – रशिया –

रुसमधील कुत्रे ‘मेट्रो डॉग्स’ म्हणून ओळखले जातात. सरकार आणि नागरिक यांची देखभाल करतात.

भारत –

दिवसेंदिवस भारतात कुत्र्यांची संख्या वाढत असून येथे आता जवळपास 1.53 कोटी भटके कुत्रे असल्याचे सांगितले जात आहे. जगातील सर्वाधिक कुत्रे असणाऱ्या देशात भारत चौथ्या क्रमाकांवर आहे.

चीन –

चीनमध्ये 2 कोटी कुत्रे आहेत. पूर्वी बीजिंगमध्ये पाळीव कुत्रे ठेवणे बेकादेशीर होते. पण, हळूहळू या निर्णयावर शिथिलता आल्याने येथे कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

ब्राझील –

येथे जवळपास 3.57 कोटी कुत्रे आहेत. ब्राजीलमधील प्रत्येक घरात एक कुत्रा असल्याने दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

अमेरिका –

कुत्र्यांच्या यादीत अमेरिका देश सर्वात पहिल्या क्रमांकावर असून येथील कुत्र्यांची संख्या 7.58 कोटी इतकी आहे.

 

 

हेही पाहा –

Comments are closed.