Dark Circles: डार्क सर्कल्स का होतात? केवळ कमी झोप नव्हे हेही प्रमुख कारण

आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला डार्क सरकर्ल्सची समस्या होते. आता डार्क सर्कल्स म्हणजे काय तर डोळ्यांखालील त्वचा काळी होणे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडणे. बऱ्याचदा हा त्रास पोषक तत्वांचा अभाव किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे होत असल्याचे बोलले जाते. तसेच कमी झोप घेणे हे याचे प्रमुख कारण आहे. पण तुम्हाला माहित आहे का केवळ कमी झोपच नव्हे तर जास्त झोपेमुळेही काळी वर्तुळे वाढू शकतात.

तज्ञांच्या मते, कमी झोप घेतल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळं वाढतात. पण गरजेपेक्षा जास्त झोप घेणे देखील यासाठी कारणीभुत ठरते. म्हणजेच तुमच्या झोपेच्या वेळेवर ही समस्या अवलंबून असते. जास्त झोपेमुळे डार्क सर्कल का वाढतात ते जाणून घेऊया..

रक्ताभिसरण

जास्त झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरण कमी होऊ शकते, ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचेखालील रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसू शकतात आणि त्यामुळे काळी वर्तुळे दिसू शकतात.

द्रव जमा होणे

गरजेपेक्षा जास्त झोपल्याने डोळ्यांखालील भागात द्रव जमा होऊ शकतो, ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा सूजलेली आणि गडद दिसू शकते.

सूज

जास्त झोपल्याने त्वचेला सूज येऊ शकते, ज्यामुळे डोळ्यांखालील त्वचा पातळ आणि गडद दिसू शकते.

हे लक्षात ठेवा:
एखादी समस्या टाळण्यासाठी बॉडीक्लॉक नियमित असणे गरजेचे आहे. म्हणजेच झोपेची वेळ, जेवणाची वेळ ही एकच असावी. तज्ञांकडून ७-८ तास झोप पुरेशी असल्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे ७-८ तास झोप तुमच्या शरीरासाठी योग्य असते.

Comments are closed.