सराफ व्यवसायिकाकडून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीची पोलिसात धावा, दोघांना अटक

गडचिरोली : लग्नाचे आमीष दाखवून 23 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण करत अश्लील व्हिडिओ व्हायरल (Video viral) करण्याची धमकी दिल्याप्रकरणी देसाईगंज शहरातील एक नामांकित सराफ व्यापारी आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सुनील पंडलिक बोके (48) आणि अक्षय कुंदनवार (32) अशी आरोपींची असून दोघेही देसाईगंजचे रहिवासी आहेत. पीडित तरुणीची सराफ व्यवसायिकासोबत मैत्री जमली होती, त्यातून लग्नाचे अमिष दाखवत आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.

आरोपी बोके याचे गांधी वॉर्ड परिसरात राधा ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. या दुकानात कामाच्या निमित्ताने पीडित तरुणीचा संपर्क सुनील बोके याच्याशी आला. त्यानंतर सुनीलने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जवळीक साधली. तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने विविध ठिकाणी शारीरिक अत्याचार केले. तसेच, तरुणीसोबत काही खासगी फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली, अशी तक्रार पीडितेने पोलिसात दिली आहे.

सराफाकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि धमक्यांमुळे पीडितेने त्याच्याशी संबंध तोडले आणि मोबाईल क्रमांक ब्लॅक केला. त्यानंतर, मात्र सुनीलने त्याचा मित्र अक्षय कुंदनवार याच्यामार्फत पीडितेवर पुन्हा दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच, मुलीचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर, पीडितेने जिल्ह्यातील देसाईगंज पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यामळे, पोलिसांनी सुनील बोके आणि अक्षय कुंदनवार दोघाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून दोघांनाही अटक केली आहे. याप्रकरणी, दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायलायने 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा

रशियाच्या व्लादीमीर पुतीन यांचा PM नरेंद्र मोदींना फोन; डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या भेटीचा दिला वृत्तांत

आणखी वाचा

Comments are closed.