Buchi Babu Trophy 2025 – वीज नाही सरफाराज खानची बॅट कडाडली, पठ्ठ्याने पुन्हा एकदा केली धमाकेदार कामगिरी

मागील काही महिन्यांमध्ये सरफराज खानच नाव चांगलच चर्चेत आहे. दोन महिन्यात 17 किलो वजन कमी केल्यामुळे त्याचं अनेकांनी कौतुकही केलं. वजन केल्यापासून जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळाली आहे तेव्हा तेव्हा त्याने आपल्या फलंदाजीची धार दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा त्याने तोडफोड फटकेबाजी करत 92 चेंडूंमध्ये 105 च्या स्ट्राईक रेटने धमाकेदार शतक ठोकलं आहे.
Buchi Babu Trophy मध्ये मुंबईच्या संघाकडून सरफराज खेळत आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात 5 व्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्याने 92 चेंडूंमध्ये शतक आणि 114 चेंडूंमध्ये 138 धावा चोपून काढल्या आहेत. 10 चौकार आणि 6 षटकारांची त्याने आतषबाजी करत गोलंदाजांना धुलाई केली. 98 धावांर 3 विकेट अशी दयनीय अवस्था संघाची झाली होती. परंतु सरफारजच्या फटकेबाजीमुळे मुंबईचा डाव सावरला. आगामी आशिया चषकाच्या पार्श्वभुमीवर सरफराजची खेळी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सरफराज खानच नाव वजन कमी केल्यामुळे मागील दोन महिन्यांपासून चांगलच चर्चेत आहे. त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्याला वगळण्यात आलं आणि सर्वच चकीत झाले. परंतु त्याने हार न मानता इंडिया ए कडून खेळताना इंग्लंडमध्ये आपल्या धमाकेदार खेळाच प्रदर्शन केलं. इंग्लंड लायन्सविरुद्ध 92 धावांची खेळी त्याने केली. आता पुन्हा एकदा त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं आहे.
Comments are closed.