Beard Growth Tips For Men: दाढी वाढवण्यासाठी दालचिनी आणि लिंबू फायदेशीर
आजकाल पुरुष मंडळी ही दाढीकडे विशेष लक्ष देतात. तरुणांमध्ये दाढीचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना दाढीची वाढ होत नसल्याने चिंता असते. असे म्हंटले जाते की, हार्मोनच्या कमतरतेमुळे दाढी वाढत नाही. अशा वेळी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. त्यासाठी दालचिनी आणि लिंबू वापरता येऊ शकते.
दालचिनी आणि लिंबाचे फायदे
दाढी वाढवण्यासाठी दालचिनी आणि लिंबू फायदेशीर ठरतो. हे नियमितपणे वापरल्याने केस दाट होतात आणि तुमचा लूक शोभून दिसतो. तज्ञांच्या मते, दालचिनी आणि लिंबूमध्ये असलेले गुणधर्म चेहऱ्यावरील छिद्रे सक्रिय करण्यास मदत करतात. दालचिनी पावडर लिंबाच्या रसात मिसळून दाढीवर नियमितपणे लावल्याने केसांची वाढ होते.
हे करा:
- हा उपाय करण्यासाठी दालचिनीचे तुकडे चांगले बारीक करून पावडर बनवा.
- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही बाजारातून दालचिनी पावडर देखील खरेदी करू शकता.
- २ चमचे दालचिनी पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा.
- यानंतर, ही पेस्ट २ ते ३ मिनिटे फेटून घ्या.
- आता तुमची पेस्ट तयार आहे.
- ही पेस्ट दाढीवर जिथे केसांची वाढ कमी होते तिथे लावा. आणि २० मिनिटांनंतर चेहरा धुवा.
हे लक्षात ठेवा:
- ही पेस्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
- जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ते वापरणे टाळा.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पेस्ट वापरल्याने तुम्हाला फायदा होईल.
Comments are closed.