11 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला इतिहास रचण्याची संधी! दक्षिण आफ्रिकेकडून जबरदस्त आव्हान
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने टी20 मालिका 2-1 अशी जिंकली होती. आता त्यांचे लक्ष वनडे मालिका जिंकण्यावर असेल. वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिचेल मार्श सांभाळणार आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेतील पहिला सामना (19 ऑगस्ट) रोजी खेळला जाईल. (Australia vs South Africa ODI series)
ऑस्ट्रेलियाला गेल्या 11 वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिका जिंकता आलेली नाही. ऑस्ट्रेलियाने शेवटची वनडे मालिका 2014 मध्ये 4-1 अशी जिंकली होती. त्या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 4 द्विपक्षीय वनडे मालिका झाल्या आहेत आणि प्रत्येक वेळी दक्षिण आफ्रिकेनेच बाजी मारली आहे.
आता ऑस्ट्रेलियाला वनडे मालिका जिंकण्याचा दुष्काळ संपवायचा असेल तर फलंदाज आणि गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियाला वनडेमध्ये नवा संघ संयोजन शोधावे लागेल. ऑस्ट्रेलियन संघात ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिस, मार्नस लाबुशेन आणि मिचेल मार्श सारखे फलंदाज आहेत. गोलंदाजीची जबाबदारी जॉश हेजलवुड सांभाळताना दिसेल.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे क्रिकेटमध्ये एकूण 110 सामने झाले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने 51 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 55 सामने जिंकले आहेत. 1 सामना अनिर्णित राहिला, तर 3 सामने बरोबरीत संपले. त्यामुळे वनडेमध्ये ऑस्ट्रेलियावर दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड आहे. (Australia vs South Africa head to head ODI)
वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ: ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), कॅमरन ग्रीन, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस (यष्टीरक्षक), आरोन हार्डी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुईस, जॉश हेजलवुड, अॅडम झाम्पा, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, अॅलेक्स कॅरी, झेवियर बार्टलेट. (Australia squad for ODI series against South Africa)
Comments are closed.