Thane Rain News – हवामान विभागाचा रेड अलर्ट; ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

ठाणे आणि नवी मुंबईला पावसाने झोडपून काढलं आहे. गेले चार दिवस पावसााचा धुमाकूळ सुरू आहे. ठाण्यामध्ये 4 तासात जवळपास 31.22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील 48 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना 18 आणि 19 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील शाळा सुद्धा बंद राहणार आहेत.

ठाणे आणि नवी मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. ठाण्यात यंदाच्या वर्षी 1 हजार 947 मिमी पाऊस पडला आहे. तसेच आज सकाळी फक्त दीड तासात 16.26 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचले होते. तसेच पुढील 48 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दुसरीकडे नवी मुंबईतही मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पुढील 48 तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने महानगर पालिकेच्या शाळांबरोबर शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Comments are closed.