मोठी बातमी…!!! उद्या 'या' वेळेला होणार आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा!

भारत पथकाची घोषणा आशिया कप: जर तुम्ही देखील 2025च्या आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या स्काॅडची आतुरतेने वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 8 संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा (19 ऑगस्ट) रोजी होणार आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करतील. (Suryakumar Yadav And Ajit Agarkar press conference) या संघात जसप्रीत बुमराहचे पुनरागमन निश्चित मानले जात आहे. मात्र, शुबमन गिल निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Asia Cup 2025 India squad)

2025च्या आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा (19 ऑगस्ट) रोजी होणार आहे. बीसीसीआयच्या मुख्यालयात म्हणजेच मुंबईत निवड समितीची बैठक होईल. त्यानंतर कर्णधार आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करतील. भारतीय संघाची घोषणा भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी केली जाईल. (Indian T20I team for Asia Cup is set to be announced Tommorow)

Comments are closed.