सरफराज खानचे शानदार शतक! वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ठोठावले टीम इंडियाचे दरवाजे

सरफराज खान शतक: सरफराज खानने बुची बाबू ट्रॉफीमध्ये (Buchi Babu Trophy) मुंबईसाठी शतक झळकावून पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही सरफराजचा भारतीय संघात समावेश झाला नव्हता. परंतु, आता टीएनसीए इलेव्हन विरुद्ध 92 चेंडूंमध्ये शतक ठोकून सरफराज खानला बीसीसीआयला हे दाखवून द्यायचे आहे की भारताच्या पुढील कसोटी मालिकेसाठी निवडकर्ते त्याच्या नावाचा देखील विचार करू शकतात.

सरफराज खान बुची बाबू ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळत आहे. टीएनसीए इलेव्हनविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या संघाने 98 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. अशा परिस्थितीत फलंदाजीला आलेल्या सरफराजला संघाची कमानही सांभाळावी लागली. सरफराजने शानदार फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली आणि स्वतःचे शतकही पूर्ण केले. (Sarfaraz Khan century)

सरफराज खानचा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश झाला नाही. मात्र आता हा खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी आपल्या फलंदाजीच्या जोरावर बीसीसीआयसमोर दावेदारी सादर करत आहे. 2025च्या आशिया चषकानंतर 3 दिवसांनी, 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका भारतातच खेळली जाईल. सरफराज खानच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. (India vs West Indies Test series)

सरफराज खानने गेल्या महिन्यात जुलैमध्ये इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. कारण सरफराजने योग्य डाइट आणि जीमच्या माध्यमातून 17 किलो वजन कमी केलं आहे. सरफराजचे हे ‘ट्रान्सफॉर्मेशन’ त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला आणखी चांगले बनवू शकते. भारतीय संघात आपले स्थान निश्चित करण्यासाठी सरफराज सतत कठोर मेहनत घेत आहे. (Sarfaraz Khan weight loss)

Comments are closed.