आशिया कपमध्ये भारताकडे आहेत सर्वाधिक जेतेपदे; जवळपासही नाही पाकिस्तान
आशिया कप 2025 साठी आज भारतीय संघाची घोषणा होणार आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. 8 संघांमध्ये होणारा हा आशिया कप यंदा T20 फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया कप च्या इतिहासात ही फक्त तिसरीच वेळ असेल जेव्हा ही स्पर्धा T20 प्रारूपात रंगणार आहे. या वेळी 8 संघांना 4-4 च्या दोन गटांत विभागण्यात आले असून भारत आणि पाकिस्तान एकाच गटात ठेवले गेले आहेत.
आशिया कप ची स्थापना 1983 मध्ये झाली आणि पहिली स्पर्धा 1984 मध्ये UAE (Sharjah) येथे झाली. तेव्हापासून आतापर्यंत ही स्पर्धा 16 वेळा झाली आहे. भारतीय संघाने सर्वाधिक 8 वेळा Asia Cup जिंकला आहे. श्रीलंका संघाने 6 वेळा विजेतेपद पटकावले तर पाकिस्तानने फक्त 2 वेळा आशिया कप जिंकला आहे.
सुरुवातीला आशिया कपचे पहिले 12 सीझन हे वन डे फॉर्मेटमध्ये खेळवले गेले. मात्र 2016 पासून ही स्पर्धा एकदा वन डे आणि एकदा T20 अशा स्वरूपात होऊ लागली. आतापर्यंत 2016 आणि 2022 मध्ये ही T20 फॉर्मेटमध्ये झाली होती.
श्रीलंका संघाने सर्वाधिक 16 वेळा आशिया कप मध्ये सहभाग घेतला आहे. तर भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांनी प्रत्येकी 15-15 वेळा स्पर्धेत भाग घेतला आहे. भारताने पहिले 5 पैकी 4 खिताब जिंकून दमदार सुरुवात केली होती. विशेष म्हणजे भारताने 1988 ते 1995 या काळात सलग 3 आशिया कप जिंकत एकमेव संघ म्हणून इतिहास रचला आहे. आशिया कपच्या विजेत्यांच्या यादीत भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 (T20), 2018 आणि 2023 अशा 8 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. श्रीलंकेने आपली ताकद दाखवत 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 (T20) अशा 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे, तर पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये फक्त 2 वेळा आशिया कप जिंकला आहे.
Comments are closed.