आशिया कपसाठी WTC पणाला, जसप्रीत बुमराहसोबत गंभीर-आगरकर काय करू इच्छितात?

आशिया कप 2025 साठी भारतीय संघाचा स्क्वॉड लवकरच जाहीर होणार आहे. सिलेक्टर अजीत अगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आज 19 ऑगस्ट रोजी संघाची घोषणा करू शकते. अंतिम निर्णय ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) च्या स्पोर्ट्स सायन्स टीमकडून येणाऱ्या मेडिकल बुलेटिननंतरच घेतला जाईल.

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कपमध्ये खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे. इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याने पाचपैकी फक्त तीन कसोटी सामने खेळले होते. मात्र आशिया कपसाठी त्याचा सहभाग ठरलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुमराहला ऑक्टोबरच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाऊ शकते. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी 2 ते 6 ऑक्टोबरदरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाणार आहे.

बुमराहने भारतासाठी शेवटचा टी20 सामना 2024 विश्वचषकाच्या फायनलमध्ये खेळला होता. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने चार षटकांत 18 धावा देत दोन विकेट्स घेतल्या होत्या.

भारत आशिया कप मोहिमेला 10 सप्टेंबर रोजी दुबईत संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध सुरुवात करेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला दुबईतच भारत-पाकिस्तानची हायव्होल्टेज लढत रंगणार आहे. संघाचा शेवटचा गट सामना 18 सप्टेंबरला अबू धाबी येथे होईल.

संभाव्य भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा, हार्दिक पांड्या, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल.

Comments are closed.