आशिया कपच्या वनडे आणि T20 फॉर्मेटमध्ये शतक ठोकणारा 'हा' आहे जगातील एकमेव खेळाडू

आशिया कप 9 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 28 सप्टेंबरला अंतिम सामना खेळला जाईल. प्रत्येकवेळी प्रमाणे या वेळीदेखील क्रिकेटप्रेमींमध्ये रोमांच शिगेला पोहोचणार आहे. पण जेव्हा आशिया कपचा इतिहास बोलला जाईल तेव्हा भारतीय दिग्गज विराट कोहलीचा उल्लेख हमखास होतो. कारण कोहली हा एकमेव फलंदाज आहे ज्याने एशिया कपच्या दोन्ही फॉर्मेटमध्ये शतक ठोकले आहे.

वनडे फॉर्मेटमध्ये विराट कोहलीने 16 सामने, 13 डावांमध्ये 61.83 च्या सरासरीने 742 धावा केल्या आहेत. यात त्याच्या नावावर 4 शतके आणि 1 अर्धशतक नोंदले गेले आहे. त्याने आपल्या वनडे करिअरमधील सर्वात मोठा स्कोर 183 धावा पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्येच ठोकला होता. ही खेळी आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.

टी20 फॉर्मेटमध्ये कोहलीने 10 सामन्यांत 85.80 च्या सरासरीने 429 धावा केल्या आहेत. या धावांमध्ये 3 अर्धशतके आणि 1 शतकाचा समावेश आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने फक्त 61 चेंडूंवर शतक ठोकून विक्रम केला होता.

आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये फक्त 2 खेळाडूंनी शतक ठोकले आहे – विराट कोहली आणि हाँगकाँगचा बाबर हयात. तर वनडे फॉर्मेटमध्ये सर्वाधिक शतक श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावावर आहेत. जयसूर्याने 6 शतके ठोकली असून दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने 4 शतके ठोकली आहेत.

Comments are closed.