या अभिनेत्रीमुळे राम चरण आणि अल्लू अर्जुन एकमेकांशी १८ वर्षे बोलत नव्हते; दोघांचेही जडले होते प्रेम… – Tezzbuzz
अल्लू अर्जुन आणि राम चरण हे दोघेही दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहेत. प्रत्येक चित्रपटात दमदार भूमिका साकारून लोकांना वेड लावतात. हे दोन्ही अभिनेते चुलत भाऊ आहेत. एकमेकांशी प्रेमळ नाते आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकेकाळी त्यांच्यात इतका वाद झाला होता की १८ वर्षे त्यांचे बोलणे थांबले होते. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे…
खरं तर ही घटना २००७ सालची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी अल्लू अर्जुनचे मन अभिनेत्री नेहा शर्मावर पडले होते जी इमरान हाश्मीसोबत ‘क्रूक’ चित्रपटात दिसली होती आणि दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. दरम्यान, राम चरणने नेहासोबत ‘चिरुथा’ चित्रपटात काम केले. येथूनच त्यांच्या नात्यात दुरावा आला.
‘चिरुथा’ मध्ये काम करत असताना, राम चरण अभिनेत्री नेहाशी जवळीक साधली. त्यांची जवळीक वाढू लागली. अल्लूला याची जाणीव होताच तो संतापला. नवभारत टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नेहा शर्माबद्दल दोन्ही भावांमध्ये बरीच चर्चा झाली होती. या वादाचा परिणाम असा झाला की दोघांमधील संवाद थांबला. वृत्तानुसार, दोन्ही कलाकार सुमारे १८ वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते.
तथापि, आता दोन्ही भावांमधील नाते खूप चांगले आहे. दोघेही अनेकदा लग्न आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. राम चरण हा दक्षिणेचा सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. तो नात्यात अल्लूचा चुलत भाऊ आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, राम चरण शेवटचा ‘गेम चेंजर’ चित्रपटात कियारा अडवाणीसोबत दिसला होता. त्याच वेळी अल्लू अर्जुन ‘पुष्पा २’ मध्ये दिसला होता. त्याचा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आमीर खान पासून मुलगा असलेली ब्रिटीश पत्रकार कोण आहे ? भाऊ फैजलने सांगितली माहिती…
Comments are closed.