मुसळधार पावसामुळे भिंतीला ओल-बुरशी, मग करा हा उपाय

गेले दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोर धरला आहे. शाळा-कॉलेजेसह अनेक कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाळा म्हटले की, मुंबईकरांसाठी दरवर्षी काही ना काही समस्या या ठरलेल्या असतात. त्यापैंकी एक म्हणजे मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे भिंतीला ओल किंवा बुरशी येणे. पावसाळ्यात भिंतीला ओल येणं ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे.

भिंतीला आलेल्या ओलाव्यामुळे घराचा आतील भाग खराब होतो आणि फर्निचरही खराब होण्यास सुरुवात होते. इतकंच नाही तर या ओलाव्यामुळे घरात एक प्रकारचा कुबट वास येऊ लागतो. सध्या बरसणाऱ्या या मुसळधार पावसामुळे तुम्हालाही ही समस्या जाणवते का? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेऊयात यावरील काही सोपे उपाय.

मेण –

खरं तर पावसाआधी या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची असते. पण, तुम्ही यावर तात्पुरता उपाय करण्यासाठी मेण चोळू शकता. या उपायाने बुरशीची समस्या कमी होऊ शकते.

डिटर्जंट –

भिंतीला बुरशी आली असेल तर यावर उपाय म्हणून डिटर्जंट स्प्रे करा. यासाठी ग्लासभर पाण्यात 2 चमचे डिटर्जंट मिसळा. हे पाणी बुरशी आली आहे त्या भागावर टाका. तासाभराने भिंत कापडाने स्वच्छ पुसून घ्या.

बेकिंग सोडा –

बेकिंग सोडा यासाठी प्रभावी उपाय आहे. ग्लासभर पाण्यात 3 चमचे बेकिंग सोडा मिसळा. तयार स्प्रे बुरशीग्रस्त भागावर लावा. यानंतर हलक्या हाताने भिंत पुसून घ्या.

लिंबू –

लिंबाचा वापर करता येईल. यासाठी 5 ते 6 लिंबाचा रस काढा. तयार रस स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि जिथे भिंतीला ओल आणि बुरशी आली आहे, तेथे फवारा.

 

हेही वाचा : 10 दिवसांतच मनी प्लांट होईल हिरवागार, फक्त करा ही गोष्ट

Comments are closed.