Asia Cup 2025: आशिया कप संघात श्रेयस-अय्यरला जागा नाही! अजीत आगरकर यांनी दिले स्पष्टीकरण
आशिया कप 2025 साठीच्या भारतीय संघातून अनेक मोठी नावे बाहेर पडली आहेत. तुफानी ओपनिंग फलंदाज यशस्वी जयस्वाल 15 सदस्यीय संघात (India Squad Asia Cup) नाही. तसंच जबरदस्त फॉर्ममध्ये असूनही श्रेयस अय्यरलाही संघात स्थान मिळालेले नाही. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाची घोषणा केली. याच पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी जयस्वाल आणि अय्यर का निवडले गेले नाहीत याचे कारण सांगितले.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी यशस्वी जायसवाल आणि श्रेयस अय्यर यांच्या निवडी न झाल्याबद्दल सांगितले की,
“यशस्वी जयस्वालसाठी हे खूप दुर्दैवी आहे कारण अभिषेक शर्मा उत्तम खेळ करत आहेत, गरज भासल्यास ते गोलंदाजीही करू शकतात. त्यामुळे त्यापैकी एखाद्याला बाहेर राहावेच लागणार होते. श्रेयस अय्यरसाठीही मी हेच म्हणेन, यात त्यांचा काहीही दोष नाही.”
अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरबद्दल सांगितले,
“टीममध्ये निवड न होणे, यात श्रेयस अय्यरची काहीही चूक नाही. मी त्यांचा आदर करतो, पण ते कुणाच्या जागी येऊ शकले असते, यात त्यांची किंवा आमचीही काही चूक नाही.”
श्रेयस अय्यरने डिसेंबर 2023 पासून एकही टी20 सामना खेळलेला नाही, पण व्हाईट बॉल फॉरमॅटमधील त्यांची अलीकडची कामगिरी त्यांना आशिया कपमध्ये टीम इंडियाचा तुरुपाचा पत्ता ठरवू शकली असती. अय्यरने आतापर्यंतच्या 51 टी20 सामन्यांच्या कारकिर्दीत 30.67 च्या सरासरीने 1,104 धावा केल्या आहेत.
टीम कॉम्बिनेशनमुळे यशस्वी जायसवाल 15 सदस्यीय संघात स्थान मिळवू शकला नसला, तरी त्याला पाच स्टँडबाय खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली आहे. एखादा खेळाडू दुखापत किंवा इतर कुठल्याही कारणामुळे स्पर्धेत खेळू शकला नाही, तर त्या परिस्थितीत जायसवाल किंवा इतर कोणत्याही स्टँडबाय खेळाडूला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.
Comments are closed.