‘अभिषेक शर्माला टीममधून बाहेर ठेवणं अवघड होतं’, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी सांगितलं कारणं

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी भारतीय संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) देण्यात आली आहे, तर शुबमन गिल (Shubman gill) उपकर्णधार असेल. गिलने जुलै 2024 मध्ये शेवटचा टी20 सामना भारताकडून खेळला होता. संघनिवडीनंतर मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी काही खेळाडू निवडले जाण्याबाबत आणि काहींना वगळण्याबाबत स्पष्टीकरण दिलं.

आगरकर यांच्या म्हणण्यानुसार, गिल अलीकडच्या टी20 सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. कारण तो खूप व्यस्त होता आणि इतर फॉरमॅट्समध्ये देखील तो गुंतलेला होता. यामुळे संजू सॅमसनसारख्या (Sanju Samson) खेळाडूंना संधी मिळाली. गिलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला टी20 संघात भरपूर सामने खेळता आले. दरम्यान, अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) टी20 क्रिकेटमध्ये चमक दाखवली आणि म्हणूनच आशिया कपसाठी संजू सॅमसनसोबत त्यालाही संधी देण्यात आली आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये आगरकर म्हणाले, संजूला खेळायला मिळालं कारण त्या काळात शुबमन आणि यशस्वी उपलब्ध नव्हते. अभिषेकला मात्र त्याच्या उत्तम कामगिरीमुळे बाहेर ठेवणं अवघड आहे. त्याची गोलंदाजीही उपयुक्त ठरते. शुबमनने मागच्या वेळी जेव्हा टी20 खेळलं होतं, तेव्हा तो उपकर्णधार होता. ती गोष्ट मागील विश्वचषकानंतरची आहे.

गिल थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येईल का, यावर आगरकर म्हणाले, कर्णधार आणि प्रशिक्षक संघासाठी सर्वोत्तम संतुलन ठरवतील. दुबईला गेल्यानंतर अधिक स्पष्टता मिळेल. सध्या आमच्याकडे इतरही चांगले पर्याय आहेत. शुबमन मागील काही महिन्यांत उत्तम फॉर्ममध्ये आहे. संजूही छान खेळतोय. त्यामुळे अभिषेकसोबत आमच्याकडे दोन चांगले पर्याय आहेत.

आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. टीम इंडिया (Team india) आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. 19 सप्टेंबरला भारताचा सामना ओमानशी होईल.

आशिया कप 2025 साठी भारतीय संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल,जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंह

Comments are closed.