आंध्र प्रदेश, तेलंगणात मुसळधार पाऊस
ढगफूटीचा अलर्ट : शाळा बंद
सर्कल संस्था/हैदराबाद
बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे आंध्रप्रदेश आणि तेलंगणात अतिवृष्टी झाली आहे. मंगळवारी काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे संकट निर्माण झाल्याने शाळा आणि महाविद्यालयांना सुटी घोषित करण्यात आली. आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम, पार्वतीपुरम आणि मन्यम जिल्ह्यांमध्ये शाळांना सुटी देण्यात आली आहे. याचबरोबर विशाखापट्टणम, अल्लूरी सीतारामाराजू, काकीनाडा आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यांमध्येही खबरदारीचा आदेश देण्यात आला आहे. अतिवृष्टी सुरूच राहिल्यास बुधवारही शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात यावी असा निर्देश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पावसाच्या स्थितीच्या समीक्षेनंतर अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तेलंगणातही शाळा बंद
तेलंगणात सिद्दीपेट आणि आदिलाबाद जिल्ह्यांमध्ये मंगळवारी शाळा बंद ठेवण्यात आला. कामारे•ाr जिल्ह्यातील डोंगाडली आणि मदनूर तालुक्यांमध्ये सुटी घोषित करण्यात आली. अतिवृष्टी जारी राहिल्यास जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटीबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्री ए. रेवंत रे•ाr यांनी केली आहे.
अनेक ठिकाणी अतिवृष्टी
तेलंगणाच्या आदिलाबाद, करीमनगर, निजामाबाद, खम्मम, हैदराबाद, वारंगल, नलगोंडा, जगतियाल, रामागुंडम, बेल्लमपल्ली, बांसवाडा, मेडक, थुप्रान, मेडचल, जनगाव, सूर्यापेट आणि कोठागुडेम येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. तर आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम, विजयनगरम, श्रीकाकुलम, एलुरु, कोनसीमा, राजमुंद्री, गुंटूर, कृष्णा, एनटीआर, ट्यूनी, बोब्ब्ली, पार्वतीपुरम, मान्यम आणि अराकू येथे अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
Comments are closed.