मुंबईत आजही कोसळधारा; पावसाचा ऑरेंज अलर्ट, मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मंगळवारी पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले होते. अवघ्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगरात ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाले. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते.
मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळ ठप्प झाली होती. रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने रस्ते वाहतूकही मंदावली होती. अशातच हवामान विभागाने आजही मुंबई परिसरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
आभाळ कोसळलं!… 26 जुलैच्या भयानक आठवणींनी भीतीचा काटा… मुंबईकर पाऊस ऍरेस्ट!
हवामान विभागाने आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रात्रभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे लोकल सेवा धीम्या गतीने सुरू आहे. आगामी दोन-तीन तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
📢 आयएमडीने मुंबई प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज लावला आहे. प्रवाशांना केवळ आवश्यक असल्यास आणि सावधगिरी बाळगल्यास प्रवास करण्याचा सल्ला दिला जातो.@Central_railway @Yatrirailways
– डीआरएम मुंबई सीआर (@डीआरएमएमबीएआयसीआर) 20 ऑगस्ट, 2025
रायगड, पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाने रायगड आणि पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारी या भागात मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नंदुरबार, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या काही भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Comments are closed.