या 5 चुकांमुळे वजन कमी होत नाही

बदलती लाइस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे हल्ली बऱ्याचजणांना वाढतं वजन ही समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणी जिमला जातंय तर कोणी महागडे डाएट फॉलो करत आहे तर अगदीच कोणी उपाशी राहत आहे. वाढलेलं वजन पाहून बऱ्याचजणांचा असा समज असतो की, वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे डाएटिंग. कारण जर काही खाल्लेच नाही तर वजन वाढणार नाही. तुम्हालाही असे वाटते का? पण, हे पूर्णपणे चुकीचे आहे. आजच्या लेखात आपण अशा चुका जाणून घेऊयात, ज्या वजन वाढीला कारण ठरतात.

पूर्णपणे उपाशी राहणे –

वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल किंवा पूर्णपणे उपाशी राहत असाल तर आरोग्यावर याचा उलट परिणाम होऊ शकतो. जेव्हा कमी प्रमाणात खाल्ले जाते तेव्हा शरीर जास्त प्रमाणात कोर्टिसोल तयार करते. कोर्टिसोल हा एक स्ट्रेस हार्मोन आहे, जो चरबी साठवतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणे हे चुकीचे आहे.

योग्य प्रमाणात पाणी न पिणे –

योग्य प्रमाणात पाणी न पिणे हे देखील वजन कमी न होण्याचे कारण असू शकते. कारण शरीर जेव्हा हायड्रेट नसते तेव्हा चरबी जाळण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य प्रमाणात पाणी प्यावे.

व्यायाम न करणे –

अनेकांचा असा समज असतो की, डाएटिंग करतोय तर वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही. पण, हा समज चुकीचा आहे. वजन कमी होण्यासाठी पोषणयुक्त आहारासोबत हलका व्यायाम करणे आवश्यक आहे.

 

हेही वाचा – गरम पेयांमुळे कर्करोगाचा धोका? वाचा संशोधन काय सांगतंय

Comments are closed.