ईएजी फ्रिजेटिंग म्हणजे काय? माहिला ईजी अधिकारी आहेत

आजच्या आधुनिक युगात तरुण पिढीचं लक्ष प्रामुख्याने करिअरकडे आहे. लग्न, मूल यांसारख्या गोष्टींना थोडा उशीर करावा लागतो. पण विज्ञानाच्या प्रगतीमुळे मातृत्वाचं स्वप्न पुढे ढकलूनही जपून ठेवता येतं. त्यासाठी महिलांना एग फ्रीजिंग हा पर्याय उपलब्ध आहे.

एग फ्रीजिंगला वैद्यकीय भाषेत Oocyte Cryopreservation म्हणतात. यात महिलांच्या शरीरातून निरोगी अंडी (Eggs) काढून घेऊन ती अत्यंत कमी तापमानात सुरक्षित ठेवली जातात. यामुळे भविष्यात महिलेला गर्भधारणा करायची असल्यास ह्याच अंड्यांचा वापर करून आयव्हीएफ (IVF) प्रक्रियेद्वारे मातृत्वाचा आनंद घेता येतो.

का गरजेचं आहे एग फ्रीजिंग?

सामान्यतः महिलांसाठी गर्भधारणेचं योग्य वय 20 ते 30 वर्षांदरम्यान मानलं जातं. पण या वयात करिअर, नोकरी, शिक्षण किंवा वैयक्तिक कारणांमुळे अनेक महिलांना मातृत्व पुढे ढकलावं लागतं. यामुळे प्रजननक्षमता कमी होण्याची शक्यता असते.

याच कारणामुळे आजकाल एग फ्रीजिंगचा पर्याय झपाट्याने लोकप्रिय होत आहे. यामुळे भविष्यात सुरक्षित मातृत्वाची संधी महिलांना उपलब्ध होते.

प्रक्रिया कशी केली जाते?

  1. प्रथम महिलेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते.
  2. निरोगी आणि सक्षम अंडी तयार होण्यासाठी आवश्यक उपचार दिले जातात.
  3. अंडी तयार झाल्यावर सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे ती शरीरातून काढली जातात.
  4. त्यानंतर ती अंडी विशेष तापमानात गोठवून (Freezing) सुरक्षित ठेवली जातात.

किती काळ ठेवता येतात अंडी?

फ्रीज केलेली अंडी साधारण 10 ते 15 वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवली जाऊ शकतात. भविष्यात जेव्हा महिलेने आई होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याच अंड्यांना प्रयोगशाळेत फलित करून गर्भधारणेची प्रक्रिया सुरू केली जाते.

कोणत्या वयात करावं एग फ्रीजिंग?

प्रजननक्षम वय 20 ते 30 दरम्यान सर्वोत्तम मानलं जातं. तज्ज्ञांच्या मतानुसार, जर महिलेला एग फ्रीजिंगचा पर्याय घ्यायचाच असेल, तर 34 व्या वर्षाच्या आधी हा निर्णय घेणं अधिक योग्य मानलं जातं.

एग फ्रीजिंग ही आधुनिक काळातील महिलांसाठी एक महत्त्वाची सुविधा आहे. मातृत्वाचं स्वप्न पुढे ढकलूनही सुरक्षित ठेवण्याची ही प्रक्रिया अनेकांसाठी जीवन बदलणारी ठरू शकते.

Comments are closed.