शुभसंकेत! गिल तिन्ही क्रिकेटचा राजा होणार

आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बीसीसीआयने ‘टीम इंडिया’च्या उपकर्णधारपदी शुभमन गिलची निवड केली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. सोमवारपर्यंत अनेक मीडियातील तज्ञ गिलला टी-20 संघात संधी मिळणार नाही, अशीच चर्चा करत होते. मात्र संघ जाहीर होताच गिलला केवळ या संधी मिळाली नाही, तर उपकर्णधारपदाची माळही त्याच्या गळ्यात पडली. इंग्लंड दौऱ्यावर शुभमन गिलकडे हिंदुस्थानच्या कसोटी संघाची धुरा सोपविण्यात आली होती. तसेच मागील आयसीसी

चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याला वन डे टीमचा उपकर्णधार बनविण्यात आले होते. आता टी-20 संघातही उपकर्णधारपद देऊन बीसीसीआयने स्पष्ट संदेश दिला आहे की, लवकरच शुभमन गिल हा तीनही फॉरमॅटमध्ये ‘टीम इंडिया’चा कर्णधार होणार आहे. हे हिंदुस्थानी क्रिकेटसाठी शुभसंकेत मानले जात आहेत.

टी-20 मध्ये नेतृत्वाचा अनुभव

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱयावर गेली होती. तेव्हा शुभमन गिलकडेच कर्णधारपद देण्यात आले होते. पुढे श्रीलंकेविरुद्ध मालिकेत सूर्यकुमार यादवला कर्णधार आणि गिलला उपकर्णधार करण्यात आले. यावरून स्पष्ट झाले की ‘बीसीसीआय’च्या संघ व्यवस्थापनाने गिलला नेतृत्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला नंतर टी-20 टीममध्ये जागा मिळाली नाही. त्या काळात अक्षर पटेलकडे टी-20 संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले. मात्र, आशिया चषकादरम्यान कोणताही दुसरा कार्यक्रम नसल्याने गिलला पुन्हा टीममध्ये जागा आणि उपकर्णधारपद मिळाले आहे.

कसोटी मालिकेत इंग्लंड दौऱ्यावर छाप

यावर्षी मे महिन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला निरोप दिल्यानंतर शुभमन गिलला कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. इंग्लंडविरुद्ध पहिल्याच मालिकेत त्याने टीमला दोन सामने जिंकून दिले आणि मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले. संघाचे नेतृत्व करताना गिल जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आणि त्याने 750 धावाही केल्या. याचाच अर्ध गिल कसोटी नेतृत्वाच्या कसोटीत पास झाला.

वन डेचा भावी कर्णधार

रोहित शर्मानंतर गिलच वन डेतही ‘टीम इंडिया’चा कर्णधार असणार, हे संकेत मिळाले आहेत. यंदाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत गिलकडे कर्णधारपद सोपविल्यास नवल वाटायला नको. तथापि काही तज्ञांचे मत आहे की, 2027 च्या वन डे वर्ल्डकपपर्यंत रोहितच नेतृत्व करत राहील. त्यानंतर शुभमनला टीमची कमान दिली जाईल. गिल सध्या वन डे क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असून, त्याची संघातील जागाही निश्चित आहे. सूर्यकुमार यादव 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपपर्यंत ‘टीम इंडिया’चा कर्णधार राहील, अशी अपेक्षा आहे,

Comments are closed.