मुख्तार अन्सारीच्या मुलाच्या 2 वर्षाची शिक्षा रद्द केली
विधानसभा सदस्यत्व परत मिळणार
Vrtasantha/ Prigaagraj
माफिया मुख्तार अंसारीचा पुत्र आणि माजी आमदार अब्बास अंसारीला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अंसारी यांची 2 वर्षांची शिक्षा रद्द केली आहे. यामुळे अंसारी यांचे विधानसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होणार आहे. अब्बास अंसारी यांनी शिक्षा रद्द करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्यावर 30 जुलै रोजी निर्णय राखून ठेवला होता. उच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिल्याने आता मऊ येथील ग्रामीण मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नाही. 2022 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मऊ येथील एमपी-एमएलए न्यायालयाने 31 मे रोजी अब्बास यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 3 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. याच आधारावर 1 जून 2025 रोजी अब्बास यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाले होते. 3 मार्च 2022 रोजी विधानसभा निवडणुकीदरम्यान अब्बास यांनी जाहीर सभेत अधिकाऱ्यांना धमकाविले होते. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
Comments are closed.