तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात; अजित पवारांनी कार्यकर्त्याला सुनावलं
वर्डमधील अजित पवार: आपल्या रोखठोक आणि शिस्तप्रिय वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कामातील हयगय, निष्काळजीपणा आणि बेशिस्तपणा अजिबात खपवून घेत नाहीत. अनेकदा एखाद्या विकासकामाची पाहणी करताना कामात त्रुटी असेल तर अजित पवार (Ajit Pawar) वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाही सर्वांदेखील सुनवायला मागेपुढे पाहत नाहीत. अजित पवार यांच्या याच वृत्तीचा अनुभव गुरुवारी वर्ध्यात आला. अजित पवार सध्या वर्ध्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी कचरा करणाऱ्या एका राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्याला चांगलेच झापले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Wardha News)
अजित पवार हे गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले. याठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. अजित पवार हे गाडीतून खाली उतरताच राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना सांगितलं की, ‘पाया पडू नका, मला पाया पडलेलं आवडत नाही.’ या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणि हारतुरे (Garland) आणले होते. एका पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याला अजित पवारांना घालण्यासाठी हार मागितला. तेव्हा या कार्यकर्त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीतून (Plastic Bag) हार बाहेर काढला आणि ती पिशवी जमिनीवर फेकून दिली. ही गोष्ट अजित पवारांच्या नजरेत भरली आणि त्यांनी सर्वांदेखील या कार्यकर्त्याला चांगलेच झापले. असा कचरा करायचा, काय रे, तुम्ही वेड्याचा बाजार. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात, अशा शब्दांत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा चांगलाच उद्धार केला.
यानंतर अजित पवार हे स्वत: प्लॅस्टिकची पिशवी उचलायला खाली वाकले. मात्र, अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाने तात्काळ ती पिशवी उचलली. यानंतर अजित पवार हे कार्यकर्त्यांना सुनावत राहिले. 100 वेळा सांगतो पिशव्या टाकू नका, लोकं शिव्या देतात, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीसाठी निघून गेले. वर्धा जिल्ह्यातील या बैठकीला आमदार समीर कुणावार, राजेश बकाने उपस्थित होते. तर पालकमंत्री पंकज भोयर हे परदेश दौऱ्यावर असल्याने बैठकीला गैरहजर होते.
https://www.youtube.com/watch?v=Untk40jure8
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.