रोहित शर्मा लवकरच कमबॅक करणार? 'या' मालिकेत खेळण्याची शक्यता, अहवालात मोठा खुलासा…
भारताचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्याच्या तयारीसाठी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए या अनधिकृत एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता आहे, असा खुलासा मीडिया रिपोर्ट्मध्ये करण्यात आला आहे. मार्चमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहितने टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2025 नंतर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटलाही दूर ठेवले होते. सध्या मात्र तो सरावाला लागला असून मालिकेत खेळण्याची त्याने इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तीन सामने 30 सप्टेंबर, 3 ऑक्टोबर आणि 5 ऑक्टोबरला होणार आहेत.
रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया ए (रेव्हस्पोर्टझ) विरुद्ध भारत एकडून खेळायला उत्सुक आहे. pic.twitter.com/tod0fgmpz7
– मुफद्दाल वोहरा (@mufaddal_vohra) 21 ऑगस्ट, 2025
दरम्यान, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांनी असा दावा केला आहे की 2027चा एकदिवसीय विश्वचषक हा रोहितचा अखेरचा विश्वचषक ठरेल. त्यानंतर टीम इंडियाचे नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवले जाईल, असा त्यांचा अंदाज आहे.
गिलने कसोटी कर्णधारपद मिळवल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधून दाखवली होती. याशिवाय गेल्या तीन वर्षांत त्याने 2000 हून अधिक धावा केल्या असून, आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे तो भविष्यातील सर्व फॉरमॅट्समधील कर्णधार ठरू शकतो, असे कैफ यांनी सांगितले.
सध्या गिल कसोटी कर्णधार आणि टी20 संघाचा उपकर्णधार आहे. आशिया कपसाठी त्याची निवड झाल्यानंतर तो जुलै २०२४ नंतर पहिल्यांदाच टी२० स्पर्धेत खेळणार आहे.
रोहितच्या पुनरागमनाने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून, खरेच तो इंडिया ए कडून खेळणार का हे पाहणे निर्णायत ठरेल.
Comments are closed.