स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेटसाठी आधारकार्ड बंधनकारक!

भारतात आता लवकरच सॅटेलाईट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी Elon Musk यांची कंपनी Starlink ने सरकारच्या UIDAI म्हणजेच आधार कार्ड कंपनीसोबत करार केलाय. Starlink इंटरनेटची किंमत किती असणार? याची माहिती आपण जाणून घेणार

गेल्या अनेक दिवसांपासून Starlink भारतात येणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.  स्टारलिंक ही कंपनी सॅटेलाईटद्वारे इंटरनेट पुरवते. याचा फायदा ग्रामीण तसेच ज्या भागात नेटवर्क इश्यू आहे किंवा धिम्या गतीने इंटरनेट चालते, अशा भागात याचा फायदा होणार आहे. त्यासाठी स्टारलिंकने कस्टमर व्हेरिफिकेशनसाठी आधारकार्ड गरजेचं केलं आहे.

जर समजा कुणाला स्टारलिंकची सेवा घ्यायची असेल तर, त्याला आता आधारकार्ड देणे गरजेचं असेल. कंपनीचा उद्देश भारतात हायस्पीड इंटरनेट देणे आहे. आधार व्हेरिफिकेशनमुळे फ्रॉड केसेवर आळा बसेल.

Starlink इंटरनेटची किंमत किती असणार?

एका रिपोर्टनुसार, अमेरिका आणि इतर देशांत स्टारलिंकचे बेसिक प्लॅन सुमारे 8000 रुपये प्रतिमहिना आहे. परंतु भारतात याची किंमत कमी असू शकते. कारण स्टारलिंकला जियो, एअरटेल आणि BSNL सारख्या कंपन्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भारतात स्टारलिंकच्या प्लॅनची किंमत 1500 ते 2500 रूपये प्रतिमहिना इतकी असू शकते.

सध्या तरी स्टारलिंक भारतात आलं नसलं तरीही, लवकरच भारतीयांच्या मोबाईलमध्ये स्टारलिंकचं इंटरनेट असणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.