भारतीय सरकारच्या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ! आशिया कप 2025 आधी घेतला हा निर्णय
पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत सरकारने आपला भूमिक स्पष्ट केली आहे. सरकारने निवेदन जारी करताना स्पष्ट केले आहे की भारतीय संघ कोणत्याही खेळासाठी आता पाकिस्तानला जाणार नाही. तसेच भारत-पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जाणार नाही.
सरकारच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ आणि खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळत राहतील. सरकारच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांनी निश्चितच दिलासा घेतला असेल. आता 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचे संघ आशिया कप 2025 मध्ये एकमेकांविरुद्ध मैदानात रंग जमवताना दिसतील.
भारतीय सरकारने पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत आपली भूमिका पूर्णपणे स्पष्ट केली आहे. सरकारने निवेदन जारी करताना म्हटले आहे की भारतीय संघ किंवा खेळाडू कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाहीत. हा निर्णय फक्त क्रिकेटपुरता मर्यादित नसून सर्व खेळांसाठी लागू असेल.
सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळताना दिसतील. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये टीम इंडिया पाकिस्तानचा बहिष्कार करणार नाही.
Comments are closed.