Asia Cup: ‘श्रेयस अय्यर पाकिस्तानमध्ये असता तर..’, माजी पाकिस्तानी खेळाडूचं मोठं वक्तव्य

आशिया कप 2025 (Asia Cup) साठी श्रेयस अय्यरकडून (Shreyas iyer) सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. जवळजवळ प्रत्येकाला वाटत होतं की, त्याला भारतीय संघात स्थान मिळेल. पण 19 ऑगस्टला जेव्हा टीम इंडियाची घोषणा झाली, तेव्हा त्यात अय्यरचं नाव नव्हतं. त्यामुळे अय्यरसोबतच त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. याच दरम्यान अय्यरबद्दल पाकिस्तानच्या माजी खेळाडूने वक्तव्य केलं आहे. त्याने सांगितलं की, जर अय्यर पाकिस्तानचा खेळाडू असता तर त्याला थेट ‘ए कॅटेगरी’मध्ये ठेवण्यात आलं असतं.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अलीने (Basit Ali) आशिया कप 2025 साठी भारतीय संघात श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, श्रेयस अय्यर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी जर पाकिस्तानात असते तर हे खेळाडू ‘ए कॅटेगरी’मध्ये असते. विशेषतः अय्यरबाबत अन्याय झाला आहे.

फक्त पाकिस्तानीच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गजही मान्य करतात की श्रेयस अय्यरला संघात संधी मिळायला हवी होती. कारण तो सातत्याने धावांचा पाऊस पाडत आहे. आयपीएलमध्येही त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही त्याने यूएईच्या मैदानावर उत्कृष्ट खेळ दाखवला होता. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आशिया कप 2025 हा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार असून, भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध असेल.

आयपीएल 2025 मध्ये अय्यरने 17 सामन्यांत 50.33 च्या सरासरीने 604 धावा केल्या होत्या. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने 5 सामन्यांत 48.60 च्या सरासरीने 243 धावा फटकावल्या होत्या.

Comments are closed.