Palghar News : तारापूर एमआयडीसीत कारखान्यात वायू गळती, चार कामगारांचा मृत्यू; चौघांची प्रकृती चिंताजनक

पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीतील कारखान्यात वायू गळतीची होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला. बोईसर तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नंबर एफ 13 मधील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड कंपनीत दुपारच्या सुमारास वायू गळती झाली. अन्य चार कामगारांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वायू गळतीचे कारण अद्याप कळलं नाही.

मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेडमध्ये दुपारी अचानक वायू गळती झाली आणि एकच गोंधळ उडाला. वायू गळतीमुळे आठ कामगारांची तब्येत खालावली. कामगारांना तात्काळ बोईसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला तर अन्य चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Comments are closed.