आधी मटका बुकीवर धाड, पु्न्हा पोलिसांना फोन; मंत्री नितेश राणेंची ‘रेड’, सगळ्यांची धावाधाव

सिंधुदुर्ग: आपल्या आक्रमक आणि हिंदुत्त्वावादी भूमिकेमुळे कायम चर्चेत असलेले भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चक्क आज मटका बुकीवर धाड टाकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कणकवली शहरात गेले कित्येक वर्षे मटका बस्तान मांडून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे बुकी आहेत. येथील नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर थेट पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास धाड टाकली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वत: मटका बुकीवर धाड टाकल्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना धाड टाकल्याचे कळवले. त्यामुळे, जिल्ह्यातील पोलिसांची चांगलीच धांदड उडाली असून पोलिसांची कुमक तात्काल घटनास्थळी दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. येथे धाड टाकल्यानंतर 11 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, लॅपटॉप, मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात येत आहेत. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा

वेळेत तक्रार करुनही कारवाई नाही, तुळजापुरातील 6000 बोगस मतदारांबाबत ओमराजेंचा निवडणूक आयुक्तांना सवाल

आणखी वाचा

Comments are closed.