जगातील सर्वात स्टायलिश क्रिकेटर कोण? व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फक्त मैदानावरील आक्रमक खेळासाठीच नव्हे तर जगभरातल्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर त्याच्या ड्रेसिंग सेन्स आणि फॅशनवरही अनेकजण फिदा आहेत. त्यामध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे माजी महान फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स (Viv Richards) यांचं नावही मोठं आहे. रिचर्ड्स स्वतः मान्य करतात की ते कोहलीच्या ड्रेसिंग सेन्सचे चाहते आहेत. 73 वर्षीय या दिग्गजांनी स्पष्टपणे सांगितलं, विराट जे काही घालतो, तेच मला देखील घालायला आवडतं.

संपूर्ण जग व्हिव्हियन रिचर्ड्सवर प्रेम करतं आणि त्यांचं नाव आदराने घेतं. अशा व्यक्तीकडून आलेली ही एक ओळ दाखवते की कोहलीच्या ड्रेसिंग सेन्सने क्रिकेटच्या पलीकडेही किती मोठं नाव कमावलं आहे. किंग कोहली मैदानावर जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा तो उत्साही आणि आक्रमक दिसतो. पण खेळाच्या बाहेर त्याचा फॅशन सेन्स साधा, शांत आणि स्टायलिश आहे.

विराट कोहलीने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे. मात्र तो अजूनही वनडे स्वरूपात सक्रिय आहे. देशासाठी त्याने शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत खेळला होता. त्या सामन्यानंतर त्याने या लहान फॉरमॅटला निरोप दिला.

फॅन्स अजून या मोठ्या धक्क्यातून सावरलेही नव्हते की 12 मे 2025 रोजी कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे त्याच्या दीर्घ कारकिर्दीला मोठं वळण लागलं. सध्या तो फक्त एकाच स्वरूपात खेळत आहे. तरीही क्रिकेटप्रेमींना अपेक्षा आहे की 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत तो निळ्या जर्सीत मैदानात दिसेल.

Comments are closed.