आशिया कप 2025 टीम निवडीत निवडकर्त्यांची मोठी चूक? भारताचा सर्वात मोठा ‘मॅच विनरच’ बाहेर!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी टीम इंडियाची (Team india) घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कर्णधारपदाखाली निवडकर्त्यांनी एकूण 15 खेळाडूंची निवड केली आहे. शुबमन गिलचे (Shubman gill) टी-20 टीममध्ये पुनरागमन झाले असून त्याला उपकर्णधाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, विश्रांतीनंतर जसप्रीत बुमराहही (Jasprit Bumrah) पुन्हा संघात दाखल झाला आहे. हर्षित राणा आणि रिंकू सिंह यांनीही संघात आपली जागा टिकवून ठेवली आहे.
मात्र, निवडकर्त्यांनी टीम इंडियाचा सर्वात मोठा ‘मॅच विनर’ मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj) संघात न घेण्याची मोठी चूक केली आहे. हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सिराजकडे दुर्लक्ष केल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं म्हणणं आहे की सिराजला पुरेशी विश्रांती मिळाली होती, त्यामुळे त्याला संघात असायला हवं होतं.
सिराजने गेल्या काही काळात सातत्याने चांगले प्रदर्शन केले आहे. इंग्लंड दौऱ्यावर त्याने फलंदाजांना हैराण करून सोडले होते. अगदी मागच्या आशिया कपमध्येही सिराजच्या खेळाने धमाका केला होता. असे मानले जात आहे की सिराज सतत सामने खेळत असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. पण त्याच्या अनुपस्थितीची खंत टीम इंडियाला नक्कीच जाणवू शकते.
Comments are closed.