पाकिस्तान नव्हे भारताला ‘हा’ संघ आशिया कपमध्ये टक्कर देणार, पाकच्या माजी खेळाडूचं परखड मत

एशिया कप 2025 नवी दिल्ली : आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. तर, अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यंदाच्या आशिया कपच्या विजेतेपदाचा दावेदार म्हणून भारताकडे पाहिलं जात आहे. भारतीय संघ आशिया कपचा गतविजेता देखील आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या निमित्तानं तयारी साठी आशिया कप देखील टी 20 फॉरमॅटमध्ये होत आहे.

भारतीय संघ सूर्यकुमार यादव च्या नेतृत्त्वात विजेतेपद मिळवण्यासाठी मैदानात उतरले. भारताच्या गटात पाकिस्तान, ओमान आणि यूएई आहे. तर ब गटात अफगाणिस्तान, श्रीलंका आणि हाँगकाँग आहे. 8 संघ एकूण 19 सामने खेळणार आहेत.

पाकिस्तानमध्ये दम नाही, भारताला हा संघ टक्कर देणार : बासित अली

आशिया कप पूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू बासित अली यांनी कामरान अकमलच्या यूट्यूब चॅनेलवर संवाद साधला. बासित अली म्हणाले आशिया कपमध्ये भारताला सर्वात मोठं आव्हान पाकिस्तान किंवा गेल्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानचं नाही. भारतापुढं केवळ एका आक्रमक संघाचं आव्हान आहे ते म्हणजे श्रीलंका असं बासित अली म्हणाले.

आशिया कपमध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरोधात होणार आहे. भारताचा दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध असेल. तर तिसरा सामना 19 सप्टेंबरला ओमान विरुद्ध असेल.

आशिया कपसाठी भारताचा संघ  (Asia Cup India Squad)

सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल (उपकॅप्टन ), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग

आशिया कप 2025 – संपूर्ण वेळापत्रक (ग्रुप स्टेज) (Asia Cup 2025 Full Schedule)

9 सप्टेंबर – अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
10 सप्टेंबर – भारत विरुद्ध यूएई
11 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
12 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध ओमान
13 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
14 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर – यूएई विरुद्ध ओमान
15 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
16 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना
20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

आणखी वाचा

Comments are closed.