‘आपण सगळेच बायसेक्शुअल…’, स्वरा भास्करचं वक्तव्य; महिला खासदारावर क्रश्न असल्याचंही सांगितलं

स्वरा भास्कर डिंपल यादवला भव्य म्हणतो: बॉलिवूडची स्पष्टवक्ती अभिनेत्री (Bollywood Actress) स्वरा भास्कर (Swara Bhasker) अनेकदा तिच्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण, सध्या स्वरा भास्कर एका वेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) नेत्या आणि अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या पत्नी डिंपल यादव (Dimple Yadav) या माझ्या क्रश आहेत, असं स्वरा भास्कर म्हणाली आहे. स्वराच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, स्वरा भास्करचा यासंदर्भातला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये बोलताना स्वरा भास्कर आपण सगळेच बायसेक्शुअल (Bisexual) असल्याचा दावाही करते.

काही महिन्यांपूर्वी स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांनी ‘स्क्रीन’सोबत एक पॉडकास्ट केला होता. या पॉडकास्टची एक क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बोलताना स्वरा म्हणते की, “माझी थेअरी अशी आहे की, आपण सर्वजण खरंतर बायसेक्शुअल आहोत. जर माणसांना त्यांच्या स्वतःच्या कर्मावर सोडलं तर आपल्या सर्वांचा स्वभाव बायसेक्शुअल आहे…”

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर पुढे बोलताना म्हणाली की, “आपल्याकडे हेट्रोसेक्शुऍलिटी… मुलगा-मुलगी वालं नातं आपल्यावर हजारो वर्षांपासून संस्कृती म्हणून लादण्यात आलं आहे. कारण मानवजातीला पुढे नेण्याचा मार्ग मानली जात होती. म्हणूनच, हा आदर्श बनवण्यात आला… ”

पुढे बोलताना स्वरा भास्कर म्हणाली की, “मला डिंपल यादवजींवर क्रश आहे… अलिकडेच मी डिंपल यादवजींना भेटले. त्या दोनदा खासदार राहिल्या आहेत आणि आता तिसऱ्यांदा खासदार आहेत… त्यांनी मुलायम सिंह जी यांच्या जागेवरून निवडणूक लढवली आणि जिंकली…” तसेच, “कदाचितच डिंपल यादव हे सगळं पाहत असतील… मी त्यांचे फोटो अनेकदा वर्तमान पत्रांमध्ये पाहिलं होतं… पण, त्या भेटीदरम्यान मी त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले… त्या खूप सुंदर आहेत, अगदी करीना कपूरसारख्या हॉट…”

दरम्यान, स्वरा भास्करच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर तिनं ‘वीरे दी वेडिंग’, ‘रांझणा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘रसभरी’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसेच, त्यानंतर स्वरा काही अंशी राजकारणातही सक्रीय आहे. स्वराचा पती फहाद हा एक राजकीय नेता आहे. 2024 मध्ये त्यानं समाजवादी पार्टीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vivek Agnihotri Explanation On Controversial Comment: वरण-भाताला गरिबांचं जेवण म्हणणाऱ्या विवेक अग्निहोत्रींचा युटर्न; आता म्हणाले, ‘मी गंमतीत…’

आणखी वाचा

Comments are closed.