PHOTO : बाळासाहेब थोरातांच्या समर्थनार्थ संगमनेर तालुका एकवाटला
संगमनेर : ‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ असे म्हणत कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संग्राम भंडारे यांचा निषेध करण्यासाठी आज (21 ऑगस्ट) संगमनेर तालुक्यातील सुमारे 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढल्याचे पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित जनतेला संबोधितांना करताना अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले.
Comments are closed.