अमेरिका भूकंपाने हादरली; दक्षिण प्रांतात जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर 8.0 तीव्रतेची नोंद

अमेरिका भूकंपाने हादरली असून दक्षिण अमेरिकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.0 इतकी नोंदवण्यात आली आहे. यावरून या भूकंपाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्यापपर्यंत भूकंपामुळे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
दक्षिण अमेरिकेतील ड्रेक पॅसेज परिसरात भूकंपाचे हे धक्के जाणवले आहेत. ड्रेक पॅसेज हा एक खोल आणि रुंद सागरी मार्ग आहे, जो नैऋत्य अटलांटिक महासागर आणि आग्नेय प्रशांत महासागराला जोडतो. पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात, एकमेकांवर घासतात, एकमेकांवर चढतात किंवा त्यांच्यापासून दूर जातात तेव्हा जमीन हादरू लागते. याला भूकंप म्हणतात. भूकंप मोजण्यासाठी रिश्टर स्केल वापरला जातो. ज्याला रिश्टर मॅग्निट्यूड स्केल म्हणतात.
रिश्टर स्केलवर 1ते 3 नोंद असल्यास सौम्य भूंकप असतो. 4 ते 7 मध्यम तीव्रतेची भूकंप असतो. तर 8 आणि 9 अतितीव्र भूकंप मानला जातो. रिश्टर स्केलवर तीव्रता 7 असेल, तर त्याच्या सभोवतालच्या 40 किलोमीटरच्या त्रिज्येत जोरदार भूकंपाचे धक्के जाणवतात. आता अमेरिकेत झालेला हा भूकंपाची तीव्रता 8 असल्याने याची तीव्रता जास्त असल्याचे मानण्यात येत आहे.
Comments are closed.