भुजबळांचा नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा, कट्टर विरोधक सुहास कांदे म्हणाले; कुंभमेळ्याचा ‘मलिदा
छगन भुजबळ वर सुहस कंडे: नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून (Nashik Guardian Minister) महायुतीतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचं नाव चर्चेत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या पदासाठी जोरदार दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नाशिकमधून सात आमदार निवडून आले असल्याने पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असावं, अशी आग्रही भूमिका भुजबळांनी मांडली आहे. मात्र, याला शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. कांदेंनी भुजबळांच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे की, “राष्ट्रवादीचे सात आमदार जरूर आहेत, पण त्यांचा पाठिंबा भुजबळांना आहेच असं नाही.” तसेच, “नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाला मी ठाम विरोध करतो,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सुहास कांदे म्हणाले की, पालकमंत्री पद कोणाला द्यावे, कुठल्या पक्षाला द्यावे आणि कोणत्या मंत्र्याला द्यावे, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु मी या जिल्ह्याचा आमदार म्हणून भुजबळ साहेबांना पालकमंत्री पद देऊ नये. त्यांना पालकमंत्रीपद दिले तर माझा विरोध राहील, असे मी ठामपणे सांगत आहे. अजितदादांचे नाशिकमध्ये नक्कीच सात आमदार आहेत. ते अजित दादांसोबत आहेत, महायुतीसोबत आहेत. परंतु सात पैकी एकही आमदार हा भुजबळ साहेबांसोबत नाही. मी भुजबळ साहेबांना आव्हान देतो की, तुम्ही गुप्त मतदान घ्या. तुम्हाला राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपमधून पालकमंत्रीपदासाठी एक मत देखील मिळणार नाही. त्यामुळे भुजबळ यांनी खोटे स्वप्न पाहणे बंद करावे, असे म्हणत त्यांनी भुजबळांच्या दाव्याला कडाडून विरोध केला.
कुंभमेळ्याचा ‘मलिदा’ खाण्यासाठी भुजबळांची उठाठेव
छगन भुजबळ यांनी मंत्री म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळ्याची आढावा बैठक घेतली. याबाबत विचारले असता सुहास खांदे म्हणाले की, भुजबळ साहेब तुम्ही तुमचे खाते बघा. आठ महिने झाले शिव भोजन थाळीचे बिल बाकी आहेत. रेशन कार्ड मिळत नाहीत. त्याच्या प्रिंटिंग बंद झालेल्या आहेत. रेशन दुकानदार अत्यंत मुजोरीपणा करतात. अधिकारी व्यवस्थित नाहीत. त्यामुळे भुजबळ साहेबांनी आपलं स्वतःचं खातं बघावं आणि त्यावर अंकुश ठेवावा. भुजबळ साहेबांनी घेतलेल्या बैठकीला काहीही अर्थ नाही. परंतु, कुंभमेळा आला की, भुजबळ साहेबांना त्यांच्या आजूबाजूचे कार्यकर्ते ज्या टेंडर नोटीस निघतात त्या दाखवतात. मग भुजबळ साहेबांच्या तोंडाला पाणी येते. कालच्या बैठकीच्या माध्यमातून भुजबळ साहेबांनी कॉन्ट्रॅक्टर्सला सांगितला आहे की, तुम्ही भुजबळ फॉर्मवर या. माझं काय असेल ते द्या आणि मग तुम्ही टेंडर भरा. ही खरी कॉन्ट्रॅक्टरला हिंट होती, असे म्हणत त्यांनी कुंभमेळ्याचा ‘मलिदा’ खाण्यासाठी भुजबळांची उठाठेव सुरू असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री अत्यंत कडक आहेत. कुठलाही भ्रष्टाचार त्यांना सहन होत नाही. त्यामुळे भुजबळ साहेबांचे मनसुबे नक्कीच उधळले जाणार आहेत, अशी टीका देखील सुहास कांदे यांनी केली.
भुजबळ कुठल्याही परिस्थितीत पालकमंत्री होणार नाही
सुहास कांदे पुढे म्हणाले की, भुजबळांकडून महायुतीची शिस्त मोडण्याचे काम सुरू आहे. खोटे स्वप्न बघण्याचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करायचे असते. भुजबळांचे प्रयत्न हे महायुतीच्या विरोधातले आहे आणि खोटे स्वप्न बघणारे आहेत. पण भुजबळ साहेब 100 टक्के पालकमंत्री होणार नाहीत. ते पालकमंत्री असताना त्यांचा इतिहास अत्यंत वाईट आहे. कुठल्याही आमदाराला ते निधी देत नव्हते. ते फक्त आपल्या नातेवाईकांना आणि त्यांच्या समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना निधी देत होते. माझाकडे या संदर्भात पुरावे देखील आहेत, असा आरोप देखील सुहास कांदे यांनी केला आहे. आता सुहास कांदेंच्या आरोपावर छगन भुजबळ काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.