Vastu Tips: स्वयंपाकघरात या वस्तू ठेवल्याने वाढतात आर्थिक अडचणी

स्वयंपाकघर हे घरातील महत्त्वाचा भाग असते. वास्तुशास्त्रात स्वयंपाक हे सुख- समृद्धीचे साधन असल्याचे म्हंटले जाते. स्वयंपाकघर हे योग्य पद्धतीने बांधणे आणि स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. हे नियम न पाळल्यास अडचणींचा सामना करावा लागतो. या नुसारच, स्वयंपाकघरात काही गोष्टी ठेवणे अशुभ मानले जाते. या गोष्टींमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊया…

फुटलेली भांडी

आपण अनेकदा स्वयंपाकघरात फुटलेले ग्लास, वाट्या किंवा प्लेट्स, कप ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार असे करणे खूप अशुभ आहे. फुटलेल्या भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक नुकसान देखील होते.

चूल, गॅस ओटा

चूल किंवा गॅस हा स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्रानुसार, चुलीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. आता आजकाल प्रत्येकाकडे चूल नसते. अशा वेळी गॅस ओटा जिथे आपण गॅस ठेऊन अन्न शिजवतो तो स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. नाही तर आर्थिक अडचणी उद्भवतात.

शिळे अन्न आणि कचरा

वास्तु तज्ञांच्या मते, स्वयंपाकघरात ठेवलेले शिळे अन्न किंवा कचरा आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरू शकते. शिळे अन्न नकारात्मक ऊर्जा वाढवते. याशिवाय कुटुंबातील सदस्यांना आजार होऊ शकतात. तसेच स्वयंपाकघरातील कचरा वेळच्यावेळी फेकावा.

पाणी

वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात पाण्याची भांडी ही नेहमी ईशान्य दिशेला असावी. जर पाण्याची भांडी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असतील तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. योग्य दिशेला पाण्याचे भांड ठेवल्याने घरात सुख-समृद्धी राहते.

झाडू आणि चप्पल

बऱ्याचदा अनेक जण स्वयंपाकघरात झाडू किंवा चप्पल ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार, हे घरात गरिबी येण्याचे लक्षण आहे. यामुळे देवी लक्ष्मीचा कोप होतो असे म्हणतात.

Comments are closed.