मोहम्मद शमी- अय्यरसोबत अन्याय झाला? इरफान पठानच्या वक्तव्याने खळबळ निर्माण

आशिया कप 2025 (Asia Cup) साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या स्पर्धेसाठी अनेक स्टार खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर काही मोठ्या खेळाडूंना मात्र वगळण्यात आले आहे. यामध्ये मोहम्मद शमी (Mohmmed Shami) आणि श्रेयस अय्यर (Shreyas iyer) ही दोन मोठी नावे आहेत. या दोघांना संघात स्थान न मिळाल्यामुळे चाहते नाराज झाले असून, सोशल मीडियावर सतत प्रश्न विचारत आहेत. शमी आणि श्रेयसला वगळणे म्हणजे अन्याय आहे का? यावर माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठान (Irfan Pathan) यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

40 वर्षीय पठान म्हणाले, आशिया कपसाठी टीमची निवड झाली आहे. अशी निवड असते की ज्यात सगळे आनंदी राहू शकत नाहीत. जे खेळाडू निवडले गेले नाहीत, ते नक्कीच दुःखी झाले असतील. कारण इतके चांगले खेळाडू आहेत, सर्वांनाच घेता येत नाही, एखादा तरी बाहेर राहणारच.

ते पुढे म्हणाले, माझ्या मते जे खेळाडू वगळले गेले, जसे वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई किंवा मग मोहम्मद शमी त्यांना संघात घेतलेले नाही. आता शमीबाबत निवडकर्ते काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे ठरेल. कारण तो सीनियर आहे, मॅच विनर आहे आणि एक दमदार खेळाडू आहे. त्यामुळे निवडकर्त्यांनी त्याच्याशी थेट बोलून पुढची योजना त्याला सांगणे गरजेचे आहे.

पठान पुढे म्हणाले, मला पूर्ण विश्वास आहे की निवडकर्ते आणि व्यवस्थापन हे काम करतील. पण श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झालं, तर त्याला वगळणे मोठी बाब आहे. जर मी अय्यरच्या जागी असतो तर मला नक्कीच वाईट वाटले असते आणि वाईट वाटणे साहजिक आहे. तो सबस्टिट्यूटमध्येही नाही, एवढं मोठं नाव असूनही त्याला पर्याय खेळाडूंतही ठेवलेलं नाही.

Comments are closed.