बाप्पाच्या आगमनाची तयारी? असे सजवा घर

भाद्रपद महिना सुरू होताच ओढ लागते ती गणेशोत्सवाची. लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या असून घराघरात तयारी सुरू आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण उत्साहाने घर सजवण्याच्या तयारीत गुंतले आहेत. यात घर स्वच्छ करण्यापासून, घर सजवणे ते डेकोरेशनचे काम करण्यात येते. तुमच्याही घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली असेल आणि घराची सजावट काय करायची हे समजत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आपण जाणून घेऊयात, घर सजवण्यासाठी काही सोप्या टिप्स,

फुलांची सजावट –

बाप्पाच्या स्वागतासाठी तुम्ही तुमच्या घराला फुलांची सजावट करू शकता. यासाठी ताज्या फुलांचा वापर करता येईल. या व्यतिरिक्त मार्केटमध्ये आर्टिफिशिअल फुलं सुद्धा मिळतात. त्यांच्या साहाय्याने घर सजवला येईल.

केळीची पाने –

घर सजवण्यासाठी केळीच्या पानांचा वापर करता येईल. तसेच ताटाऐवजी तुम्ही बाप्पाला केळीच्या पानांमध्ये नैवेद्य दाखवू शकता.

कागद हस्तकला –

गणपतीसाठी घरी सुंदर असे पेपर क्राफ्ट करून घर सजवता येईल. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेता येईल.

प्रकाश

गणेशोत्सवात घर लख्ख प्रकाशाने झगमगावे असे वाटत असेल तर रंगीत लाइटिंगने घर सजवू शकता. याशिवाय बाप्पाच्या डेकोरेशनलाही लाइटिंग करता येईल. सध्या बाजारात विविध प्रकारचे लाईट्स ऑप्शन आले आहेत. याचा वापर करता येईल.

रांगोळी –

गणपतीच्या स्वागतासाठी तुम्ही तुमच्या घरी सुंदर अशी रांगोळी काढू शकता. यासाठी रंगाची रांगोळी अथवा फुलांची रांगोळी असे पर्याय आहेत. गणपतीच्या आसनाजवळ तसेच मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही रांगोळी काढता येईल.

 

हेही पाहा –

Comments are closed.