Asia Cup: भारत-पाकिस्ताननंतर या देशाने जाहीर केला संघ, स्टार खेळाडूला मिळालं कर्णधारपद

आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी आतापर्यंत अनेक देशांनी आपापल्या संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारत-पाकिस्तानने (IND & PAK) आधीच आशिया कपसाठी आपला संघ जाहीर केला आहे. आता या यादीत हाँगकाँगचाही समावेश झाला आहे. हाँगकाँगने 22 ऑगस्ट रोजी मेगा इव्हेंटसाठी आपला संघ जाहीर केला आहे.

आशिया कप 2025 मध्ये हाँगकाँगकडून यासिम मुर्तझा (Yasim Murtaza) याला कर्णधारपद देण्यात आले आहे. त्याच्याशिवाय स्टार खेळाडू बाबर हयातलाही (Babar Hayat) संघात स्थान मिळाले आहे. हाँगकाँगने आपल्या संघात बहुतांश भारतीय आणि पाकिस्तानी मूळ असलेल्या खेळाडूंना संधी दिली आहे.

आशिया कप 2025 साठी हाँगकाँगचा संघ-
यासिम मुरताजा (कर्नाधर), बाबर हयात, आदिल महमूद, झीशान अली (यशर रक्ष), एहसन खान, अनस खान, शाहिद वसीफ (यशरारक), कल्लू, आरोन अर्शाद, निझकत खान, न्युर्हतू हुसान गजनाफर, मार्टिन कोएटेज, मोहम्मद गझनफर अंशुमान रथ, किडी शाह.

Comments are closed.