गोदावरीला पूर, राक्षसभुवनचे शनी मंदिर पाण्याखाली; अमावस्येचे शनी दर्शनही बंद
पैठण येथील नाथसागर (जायकवाडी) धरणात पाण्याची आवक वाढल्याने काल धरणाचे 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदीला पाणी मोठ्या प्रमाणात वाढले असून गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील शनी मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी सर्वत्र पाणीच पाणी आले आहे. गोदावरी नदी दुधडी भरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान शनी महाराज मंदिराला पाण्याचा वेढा पडल्यामुळे शनी महाराजांचे दर्शन बंद करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यात गेली चार ते पाच दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी पैठणच्या जायकवाडी धरणाच्या वरच्या भागात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जायकवाडी धरणाचे 18दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. गोदावरीला पाणी वाढल्याने साडेतीन पिठाचे शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या राक्षसभुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेले आहे.
Comments are closed.