राहुल गांधींची पंतप्रधान होण्याची संधी गेली, ते मोदींना कधीच हरवू शकणार नाहीत, आठवलेंचा दावा
राहल गांधीवरील रामदास अथेले: राहुल गांधी (Rahula Gandhi) नरेंद्र मोदींना कधीच हरवू शकणार नाहीत. त्यांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. राहुल गांधी मत चोरीच्या मुद्यावर एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे बोलतात पण आयोगासमोर जात नाहीत असे आठवले म्हणाले.
शरद पवार यांना अडीच वर्षासाठी पंतप्रधानपद देण्याबाबत मी बोललो होतो
राहुल गांधींना त्याचवेळी पंतप्रधान होण्याची संधी होती. मी तेव्हा युपीएमध्ये असताना तात्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दुसरी टर्म देण्यापूर्वी सोनिया गांधी यांना आपण तसेच सुचवलेही होते. मात्र, भविष्यात काँग्रेसला मोठे बहुमत मिळून राहुल गांधी पंतप्रधान होतील असे काँग्रेसला वाटत असल्याने त्यांची संधी गेली. आता ते कधीच नरेंद्र मोदी यांना हरवू शकणार नाहीत. त्यामुळं भविष्यात ते कधीही पंतप्रधान होणार नाहीत असा दावा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. त्यावेळी आपण शरद पवार यांनाही अडीच वर्षासाठी पंतप्रधानपद देण्याबाबत बोललो होतो. मात्र पवार हे सोनिया गांधी यांच्या परदेशी मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडले होते. पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन परदेशी मुद्द्याबाबतची भूमिका चुकीची होती असे सांगावे असेही आपण सुचवले होते. मात्र ते घडले नाही असा गौप्यस्फोटही आठवले यांनी केला आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे सत्ताबळ
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमच्याकडे पुरेसे सत्ताबळ असून कोणताही धोका एनडीएला होणार नाही असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. जरी विरोधकांचा उमेदवार आंध्र प्रदेशचा असला तरी चंद्राबाबू नायडू यांचे एकही मत विरोधकांना मिळणार नाही असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपती होण्याची संधी मिळत असल्याने हा आपल्या राज्याचा बहुमान असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी फक्त गोंधळ घालून जनतेच्या पैशाची बरबादी केल्याची टीका करताना मत चोरी मुद्द्यावर राहुल गांधी शास्त्रज्ञासारखे बोलतात असा टोलाही लगावला. मात्र याबाबत निवडणूक आयोगाकडे जाऊन भूमिका मांडा म्हणल्यावर मात्र ते जात नाहीत असे आठवले यांनी सांगितले. निवडणूक आयोग स्वायत्त असून त्याच्यावर सरकारचेही नियंत्रण नसते, असे आठवले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Ramdas Athawale : एकमेकांवर आरोप करून महाराष्ट्र आपल्याला अशांत करायचाय का? यवतमधील तणावावरून राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोधकांना सुनावलं
आणखी वाचा
Comments are closed.