होय, मतदान यादीत आमचं नाव दोनदा, पण..; इंद्रजीत चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांसह भाजपवर पलटवार
सातारा : मतचोरीच्या मुद्द्यावरुन साताऱ्यात भाजपा आणि काँग्रेसमध्ये (Congress) जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, भाजप आमदार अतुल भोसले यांच्या कराडमधील पदाधिकाऱ्यांनी थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरच मतचोरीचा गंभीर आरोप केला असून चव्हाण कुटुंबातील 9 जणांची दुबार, तिबार मतदार नोंदणी झाल्याचे पुरावेच त्यांनी दिले. तसेच, पृथ्वीराज चवन (पृथ्वीराज चवन) यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांचे तीन ठिकाणी मतदान यादीत नाव असल्याचेही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितलं होतं. आता, इंद्रजीत चव्हाण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून आपलं नाव मतदार यादीत दोन ठिकाणी असल्याचे त्यांनी मान्य केलंय. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव घेतल्यावर बातमी होत म्हणत दोनदा मतदान केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबातील सदस्यांनीच दोनवेळा मतदान केल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांनी फेटाळला आहे. आमच्या कुटुंबियांनी एकाच ठिकाणी मतदान केले आहे. आमची नावे दोन ठिकाणी आहेत, मात्र आम्ही प्रत्येकवेळेस नाव कमी करण्यासाठी अर्ज केला होता, त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत, असे इंद्रजीत चव्हाण यांनी म्हटले. पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव मोठं असल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे नाव घेतले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेतलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेऊन भाजपला आपलं काही काळबेरे दडवायच आहे का? असा संवालही पृथ्वीराज चव्हाण यांचे पुतणे इंद्रजीत चव्हाण यांनी उपस्थित केला. तर, दोनदा मतदान केल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसात सिद्ध करावे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर यांनी दिला आहे.
भाजपचा आरोप, चव्हाण कुटुंबातील 9 जणांची दुबार नावे (Prithviraj chavan)
कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात दुबार, तिबार मतदान नोंदणी झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी दुबार मतदार नोंदणी करून 2014, 2019 ची निवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी विद्यमन आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या पदाधिकाऱ्यांनी केला. ‘व्होटचोरी’ कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच केल्याचेही अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. कराडमधील पाटण कॉलनीतील घरात 15 नावं आहेत, त्यातील अनेकजण घरात राहत नाहीत. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील 9 लोकांची दुबार नावे आहेत. दुबार, तिबार नावात पृथ्वीराज चव्हाण यांचे भाऊ, पुतणे, वहिनी याच्यासह कुटुंबियांची नावे आहेत. कराड दक्षिण विधानसभा आणि पाटण विधानसभा मतदार संघात पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातील नावे असल्याचेही भाजपचे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
कुठे काळा पोळा, कुठे कर्जमाफीचा मुद्दा; बैलपोळ्याला सर्जा-राजावर झळकला ‘चलो मुंबई’चा नारा
आणखी वाचा
Comments are closed.