चेंडू टाकताना घसरला गोलंदाज, नंतर जे केलं ते पाहून चाहते थक्क! VIDEO व्हायरल

दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2 वा एकदिवसीय: दाक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांनी 22 ऑगस्ट रोजी मालिकेतील दुसरा वनडे सामना मॅकेच्या मैदानावर खेळला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु नियमित कर्णधार टेंबा बावुमाशिवाय खेळणाऱ्या या संघाला 49.1 षटकात 277 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन संघ 37.4 षटकात 193 धावांवर सर्वबाद झाला आणि त्यांना 84 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू विआन मुल्डर गोलंदाजी करताना जखमी होण्यापासून थोडक्यात बचावला, त्यानंतर त्याने असे काही केले, ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले. (Wiaan Mulder Bowling)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात विआन मुल्डर 10व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला, त्यावेळी पहिल्या चेंडूवरच त्याचा पाय क्रीजवर खूप वाईट प्रकारे घसरला, ज्यामुळे तो थोडक्यात बचावला. पुढच्याच चेंडूवर कॅमरन ग्रीनने एक धाव घेतली आणि मिचेल मार्शला स्ट्राइक दिली. मुल्डरने दुसरा चेंडू टाकला, तेव्हा मिचेल मार्श फलंदाजी करत होता. त्याने मिड-ऑनच्या दिशेने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यात यशस्वी झाला नाही. तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या कॉर्बिन बॉशने त्याचा सोपा झेल घेतला. अशाप्रकारे, विआन मुल्डरने मिचेल मार्शसारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करत आपल्या संघाला महत्त्वाचे यश मिळवून दिले. (South Africa vs Australia 2nd ODI)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दुसऱ्या वनडे सामन्यात विआन मुल्डरने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याने 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली, ज्यामुळे संघाची धावसंख्या 200 पेक्षा जास्त झाली. गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने 5 षटकांत 31 धावा देत 1 विकेट्स घेतली. (Wiaan Mulder Performance)

Comments are closed.