एडम झम्पाने शेन वॉर्नच्या क्लबमध्ये मिळवली खास जागा, रचला ऐतिहासिक विक्रम

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली गेली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 22 ऑगस्टला खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झम्पा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर झम्पाने शेन वॉर्नच्या (Shane Warne) क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे. तो ऑस्ट्रेलियासाठी मोठा पराक्रम करणारा चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

ॲडम झम्पा (Adam Zampa) हा ऑस्ट्रेलियाचा चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे ज्याने घरच्या मैदानावर वनडे फॉरमॅटमध्ये 50+ विकेट घेतल्या आहेत. त्याने या खास यादीत आपली नोंद केली आहे. घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियासाठी वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट शेन वॉर्नच्या नावावर आहेत. त्याने तब्बल 136 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पीटर टेलरने 77 विकेट घेतल्या होत्या. तर ब्रॅड हॉग 57 विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता या यादीत चौथं नाव झम्पाचं लागलं आहे. झम्पाने 52 विकेट घेऊन या यादीत प्रवेश केला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात झम्पाने 10 षटकांत 63 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केले.

पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 49.1 षटकांत 277 धावांवर सर्वबाद अशी खेळी केली. आफ्रिकाकडून सर्वाधिक धावा मॅथ्यू ब्रीट्झके यांनी केल्या. त्याने 78 चेंडूत 88 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्सने 87 चेंडूत 74 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 37.4 षटकांत 193 धावांवर गारद झाली. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा जोश इंग्लिसने केल्या. त्याने 74 चेंडूत 87 धावांची खेळी केली.

Comments are closed.