Asia Cup: कोणत्या भारतीय कर्णधाराने सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकला? पाहा संपूर्ण यादी
आशिया कपची (Asia Cup) सुरुवात 1984 साली झाली होती. गेल्या 41 वर्षांत हा स्पर्धा एकूण 16 वेळा खेळली गेली आहे. आता 2025 मध्ये याचा 17 वा हंगाम होणार आहे, ज्यात 8 संघ सहभागी होतील. आतापर्यंतच्या इतिहासात भारताने सर्वाधिक यश मिळवले आहे. टीम इंडियाने तब्बल 8 वेळा हा किताब जिंकला आहे. पण, काय प्रत्येक वेळी वेगळ्या कर्णधाराने भारताला आशिया कप जिंकवून दिला होता? चला जाणून घेऊया की, आतापर्यंत कोणकोणत्या भारतीय कर्णधारांनी आशिया कप ट्रॉफी उंचावली आहे.
सर्वात पहिला आशिया कप भारताने जिंकला होता आणि त्या वेळी टीमचे नेतृत्व सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी केले होते. त्यानंतर चार वर्षांनी दिलीप वेंगसरकर (Dilip Vengaskar) यांच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा आशियाई विजेता ठरला. गावस्कर आणि वेंगसरकर या दोघांनीही प्रत्येकी एकदा भारताला विजेतेपद मिळवून दिलं.
मोहम्मद आझरुद्दीन, एम.एस. धोनी आणि रोहित शर्मा यांनी मात्र प्रत्येकी दोन वेळा टीम इंडियाला आशिया कप जिंकवून दिला आहे. आझरुद्दीनने 1990 आणि 1995 मध्ये ट्रॉफी जिंकली, धोनीने 2010 आणि 2016 मध्ये, तर रोहित शर्माने त्यांची परंपरा पुढे नेत 2018 आणि 2023 मध्ये भारताला आशियाई विजेतेपद दिले. विराट कोहलीला मात्र कधीच आशिया कपमध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही.
भारताचे आशिया कप विजेते कर्णधार
सुनील गावस्कर – 1984
दिलीप वेंगसर्कर – 1988
मोहम्मद अझरुद्दीन – 1990, 1995
एम.एस. धोनी – 2010, 2016
रोहित शर्मा – 2018, 2023
या वेळी टीम इंडियाची धुरा सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar yadav) आहे. त्याच्यासाठी हा सुवर्णसंधीचा क्षण असेल, कारण विजय मिळवला तर तेही आशिया कप जिंकणाऱ्या दिग्गज भारतीय कर्णधारांच्या यादीत आपले नाव कोरेलं. विशेष म्हणजे, हे पहिलेच मल्टी-नेशन टूर्नामेंट असेल ज्यात सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करणार आहे.
Comments are closed.