आशिया कपपूर्वी बीसीसीआयचे धक्कातंत्र! 15 वर्षांपासून संघात असलेल्या मेंबरला दाखवला बाहेरचा रस्त

राजीव कुमार संघ कोण आहे: भारतीय क्रिकेट संघ 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025ची जोरदार तयारी करत आहेत. पण याचदरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून टीमच्या सपोर्ट स्टाफचा अविभाज्य भाग असलेले मसाज थेरेपिस्ट राजीव कुमारशी आता बीसीसीआयने नाते तोडले आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर त्याचा करार संपुष्टात आला होता आणि तो पुढे न वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये होते आहेत सतत बदल

गेल्या काही काळापासून टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सतत बदल होताना दिसत आहेत. राजीव कुमार गेली 15 वर्षे मसाज थेरेपिस्ट म्हणून काम करत होते, पण आता त्याची निवड झाली नाही. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीनंतर सहायक कोच अभिषेक नायरला पायउतार करण्यात आले होते. तसेच स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच सोहम देसाईलाही पदावरून दूर केले गेले होते.

असा अंदाज वर्तवला जातो की, संघ व्यवस्थापनातील काही वरिष्ठ सदस्यांचे मत आहे की, एकाच सहयोगी स्टाफला राष्ट्रीय संघासोबत खूप काळ ठेवले, तर त्याचा फायदा कमी होत जातो. तसेच दीर्घकाळ एकत्र राहिल्याने खेळाडू व स्टाफमध्ये अतिसहजतेचे नाते तयार होते, जे संघाच्या प्रगतीसाठी चांगले नाही.

आशिया कप 2025वर सर्वांचे लक्ष

यूएईमध्ये 9 सप्टेंबरपासून होणाऱ्या आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली आहे. या संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून, शुभमन गिल उपकर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. गिलची टी-20 संघात बराच काळानंतर पुनरागमन झाले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपला लक्षात घेता आशिया कप हा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत अनेक खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ – (Team India Squad For Asia Cup 2025)

  • फलंदाज : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग.
  • अष्टपाई: हार्दिक पांड्या, शिवम दुबे, क्षरा पटेल.
  • यष्टिरक्षक : संजू सॅमसन, जितेश शर्मा.
  • गोलांडज: जसप्रीत बुमराह, वरुना चक्रवर्ती, अर्शदिप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा.

हे ही वाचा  –

Bangladesh Squad Asia Cup 2025 : धडाकेबाज फलंदाजाची मैदानात एन्ट्री! भारत-पाकनंतर आशिया कपसाठी आणखी एका संघाची घोषणा, 16 जणांची फौज सज्ज

आणखी वाचा

Comments are closed.