टीम इंडियाची जर्सी प्रायोजकाविना

आगामी आशिया कपमध्ये हिंदुस्थानी संघावर लोगोविना जर्सी घालण्याची वेळ येऊ शकते. नुकत्याच मंजूर झालेल्या ऑनलाइन गेमिंग प्रचार व विनियमन विधेयकानंतर ड्रीम-11 सह सर्व फँटसी स्पोर्ट्स व जुगार प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रीम-11 जुलै 2023 पासून हिंदुस्थानचा मुख्य प्रायोजक आहे, मात्र नवीन कायद्यानंतर त्यांचे प्रायोजकत्व धोक्यात आले आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनीही जे कायदेशीर नाही ते आम्ही करणार नाही. केंद्र सरकारच्या धोरणांचे पालन बीसीसीआय करेल असे स्पष्ट केले आहे.
Comments are closed.