पाकिस्तानसोबत क्रिकेट म्हणजे शहिदांचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा अपमान; संजय राऊत यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

आशिया चषक 2025 मध्ये पाकिस्तान सोबत खेळलेल्या केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. क्रीडा मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयावर चौफेर टीका होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हिंदुस्थान-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना विरोध दर्शवला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट म्हणजे शहिदांचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा अपमान असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.

पत्रात संजय राऊत म्हणतात, पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्यांचे रक्त अद्याप सुकलेले नाही. या हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यातील अश्रू अजून थांबलेले नाही आणि तरीही पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिला हे प्रत्येक देशवासीयासाठी वेदनादायक आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाच्या परवानगी शिवाय ही शक्य नाही.

Comments are closed.